Advertisement

Latest Jobs

6/recent/ticker-posts

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४

Advertisement

Advertisement

                      मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना २०२४

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना २०२४ :

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

पात्रता :

  •  महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  •  राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  •  किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  •  लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  •  लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अपात्रता :

  •  ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  •  ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  •  ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  •  सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  •  ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  •  ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  •  ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचे लाभ :
  • मासिक आर्थिक सहाय्य: पात्र महिलांना दरमहा ₹1,500 मिळतील.
  • मोफत LPG सिलिंडर: वर्षाला तीन मोफत LPG गॅस सिलिंडर दिले जातील.
  • शैक्षणिक सहाय्य: इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील (EWS) गरीब मुलींसाठी महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण प्रवेशासाठी फी माफी.
  • माझी लाडकी बहिन योजना ही महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत प्रदान करणे आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचा मुख्य उद्देश :
  • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. या योजनेद्वारे महिलांना नियमित उत्पन्न मिळेल, ज्यामुळे त्या त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकतील. या योजनेची इतर काही उद्दिष्टे आहेत :
  • महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत करणे
  • महिलांना समाजात मानाचे स्थान देणे
  • महिलांचा आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य वाढवणे

अर्ज प्रक्रिया :

  •  ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
  •  अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

अधिकृत वेबसाइट : Click Here

अधिकृत अधिसूचना : Click Here

FAQ (Frequently Asked Questions) :

Q.1 माझी लाडकी बहीण योजना साठी काय काय कागदपत्रे लागतात ?

  • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला 
  • उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • बँक पासबुक 
  • अर्जदाराचा फोटो

Q.2 लाडली बहना योजनेसाठी कोण पात्र आहे ?

Ans. लाडली बहना योजनेसाठी कोण पात्र आहे? 21 ते 60 वर्षे वयोगटातील मध्य प्रदेशात राहणाऱ्या केवळ विवाहित महिलाच लाडली बहना योजनेसाठी नोंदणी करण्यास पात्र आहेत. तथापि, महिला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन नसावे, करदाते नसावेत किंवा कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नसावी.

Q.3 लाडकी बहीण योजना पैसे चेक कसे करायचे ?

Ans. लाडकी बहीण योजेनेत जर तुम्ही अर्जात भरलेले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही, याची खात्री करून घ्या. तसेच जर बँक खाते लिंक असेल तर ऑनलाईन बँकींग अॅपद्वारे तुम्ही खात्यात पैसे आले आहेत की नाही हे चेक करू शकता.

Q.4 लाडकी बहिण योजना अर्ज कुठे करायचा ?

Ans. अर्जदाराने संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे.

Q.5 महाराष्ट्रात महिला योजना काय आहे ?

  • महिला, मुलींसाठी योजना :
  • बेटी बचाओ, बेटी पढाओ
  • महिला आणि बालविकास विभागाच्या योजना
  • मनोधैर्य योजना
  • 'माझी कन्या भाग्यश्री'
  • जिजाऊ वसतिगृह
  • अल्पसंख्याक मुलींसाठी वसतीगृहे
  • सामाजिक न्याय विभागाच्या योजना

Q.6 लाडकी बहीण योजनेचे स्टेटस कसे चेक करावे ?

Ans. सर्वप्रथम नारीशक्ती दूत अॅप उघडा आणि त्यामध्ये लाभार्थी महिलेचा मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्ही तुमचे अकाउंट लॉग इन करा. अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल हा ओटीपी वेरिफाय करा. लॉग इन केल्यानंतर मेन्यू मध्ये योजनांची सूची येईल, यामध्ये माझी लाडकी बहीण योजना निवडा.

Q.7 लाडकी बहिन योजनेची रक्कम कधी जमा होणार ?

Ans. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांचे आरोग्य, पोषण आणि कौटुंबिक भूमिका सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू केली. पात्र महिलांना रु. जुलै 2024 पासून 1,500 मासिक, 21-65 वयोगटातील ज्यांचे कुटुंब उत्पन्न रु. पेक्षा कमी आहे त्यांना लाभ. 2.5 लाख.

Advertisement

Post a Comment

0 Comments

Advertisement